Ads
मेजवानी

Sunday Special Recipe: रवा मसाला डोनट

डेस्क desk team

लहान मुलांना, तरुणांना आवडणारा आणि आरोग्यदायी असणारा पदार्थ म्हणजे रवा मसाला डोनट. याच पार्श्वभूमीवर रवा मसाला डोनटची पाककृती जाणून घेऊयात…

साहित्य :

1 वाटी रवा, कढीपत्ता, कोथिंबीर, दोन मिरच्या, भाजलेले जिरे एक चमचा, अर्धा चमचा बडीशेप, आले, चाट मसाला, हळद, बटाटा, मीठ, तेल, पाणी.

कृती :

  • कढईत रवा 5 मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यात तीनपट पाणी घालून ते नीट मिसळा. मग 1 चमचा तेल घाला.
  • परत नीट मिसळून त्याला एक वाफ काढावी. दुसरीकडे उकडलेला बटाटा किसून घ्या. थंड झालेला रवा बाऊलमध्ये काढा.
  • त्यात किसलेले बटाटे,आले, भाजलेले जिरे, बडीशेप, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, मिरच्या चिरुन एकत्र करून त्याचा गोळा करा.
  • या मोठ्या गोळ्याचे लहान लहान लिंबाएवढे गोळे करून ते गोल थापटून त्याला होल पाडून डोनटचा आकार द्या.
  • नंतर हे डोनट गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. सॉस किंवा हिरवी चटणीसोबत खावयास द्यावेत.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: