गाव म्हंटले की डोळ्यासमोर येते ते शेती, गरिबी, छोटी घर, सुख सोयींचा अभाव पाहायला मिळतो. पण जगात असाही एक गाव आहे. या सगळ्या परिस्थितीला अपवाद आहे. या गावाचे ‘हॉक्सी’हे नाव असून चीनमधील जियांग्सू या प्रांतात आहे. या गावात फक्त 2 हजार लोकसंख्या असले तरी एखाद्या मेट्रो सिटीला ते लाजवेल असे आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाकडे करोडो नाही तर अब्जावधी संपत्ती आहे. तर जाणून घेऊयात या गावाबद्दल…
शहरातील सुखसोयी या गावात
चीनमधील हॉक्सी या गावाची स्थापना 1960 साली झाली आहे. या गावात शहरातील सर्व सुविधा येथे राहणाऱ्या नागरिकाला उपलब्ध आहेत. प्रत्येक शेतकरी 90 लाखाहून अधिक उत्पादन घेतो. या गावात राहणाऱ्या अधिकृत नागरिकाला शिक्षण फ्लॅट, हेल्थ केअर, हेलिकॉप्टर टॅक्सी, आलिशान गाड्या यासारख्या सुविधा अगदी मोफत दिल्या जातात. परंतु गाव सोडून गेला कि हे सगळ्या वस्तू सरकारला परत कराव्या लागतात.
पर्यटनासाठी काय?
हॉक्सी हे गावा सुपर व्हिलेज या नावानेही प्रसिद्ध आहे. या गावात 72 मजली इमारत आहे. ही इमारत पाहाण्यासाठी अनेक पर्यटक गावाला भेट देतात. तसेच या गावात थीम पार्क, स्वच्छता आणि नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळतात. त्याचबरोबर शेजारांच्या घरातही म्हणजेत दोन मिनिटाच्या अंतरावर जाण्यासाठी ही हेलिकॉप्टरचा वापर करताना दिसतात.
हे गाव सुरूवातीपासूनच श्रीमंत नव्हते. अगदी गरिब असलेल्या या गावाला सुपर व्हिलेज करण्याचे काम ‘वू रेनबाओ’ या व्यक्तीने केले आहे. ‘वू रेनबाओ’ हे लोकल कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी होते. सामूहिक शेती आणि इंडस्ट्रीयल प्लॅनच्या जोरावर त्यांनी गावाला समृध्द केले. गावातील जवळपास 90% प्रॉपर्टी आजही त्यांच्याच कुटूंबियांकडे आहे आणि त्यांचा चौथा मुलगा आज या गावचा प्रमुख आहे.