बुलढाण्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. एका लिंबाच्या झाडातून चक्क दुध वाहत आहे. ग्रामस्थ हे दुध पियत सुद्धा आहेत. काही ग्रामस्थ याला चमत्कार हि मानत आहेत. दरम्यान या घटनेने लिंबाच झाड एका वेगळ्याच कारणासाठी कुतुहलाच विषय ठरलय.
विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावात निंबाच्या झाडातून सफेद पाणी पडत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. गावातील रहिवासी शशिकलाबाई वाकोडे यांच्या घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडातून गेल्या दहा दिवसापासून सफेद रंगाचा पाण्याचा सारखा एक द्रव पदार्थ पडत आहे. लिंबाच्या झाडातून अशा प्रकारे सफेद पाणी येत असल्याने ग्रामस्थांसाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे.
चर्चेला उधाण
लिंबाच्या झाडातून अशा प्रकारे सफेद पाणी पडत असल्याने गावकऱ्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, अंधश्रद्धा बाळगणारे अनेक ग्रामस्थ या प्रकाराला चमत्कार समजत आहेत, तर कोणी निसर्गाचा कोप म्हणतो तर कोणी याला निसर्गाचा चमत्कार मानत आहे. दरम्यान, अनेक औषधी गुणधर्म असल्याने औषध म्हणून वापरण्यात येत असलेल्या लिंबाच्या झाडातून निघणारा हा सफेद द्रव पदार्थ शशिकलाबाई सह अनेक नागरिक प्यायला लागले आहेत. यामुळे अनेक आजार बरे होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लिंबाच्या झाडातून निघणारे सफेद द्रव्य
तीन वर्षांपुर्वी अशीच घटना
अशा प्रकारे लिंबाच्या झाडातून सफेद पाणी पडत असल्याची घटना तीन वर्षांपुर्वी देखील घडल्याचे शशिकलाबाई वाकडे यांनी सांगितले. त्यावेळी सलग एक महिनाभर अशा प्रकारे झाडातून सफेद पाणी पडत असल्याची माहिती त्यांनी दिली. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरत असून, लोक हे झाड पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र झाडातुन असा पांढरा द्रव्य का पड़त आहे हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे.