महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता नव्या राजकीय समीरकणासह मैदानात उतरताना दिसणार आहे. यासाठी उद्या 23 जानेवारीला महाअधिवेशन बोलवण्यात आली असून, यामध्ये नवीन वाटचाल कळणार आहे. राजकीय सूत्रानुसार पक्ष हिंदुत्वाच्या मुद्यावरून मैदानात उतरणार आहे.
मनसेने 23 जानेवारीला महाअधिवेशन बोलावले आहे.या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मोठे बदल करणार आहेत. पक्षाचा झेंडा व राजकीय डावपेच बदलणार आहेत. पक्षाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही मात्र अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ एका जागेवर यश मिळाले होते. त्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार आहे.तसेच काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची हि बैठक घेतली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोघेही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन एकत्र लढणार असल्याची राजकीत वर्तुळात चर्चा आहे.
कार्यकर्त्यांना आवाहन
पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..
पण सच्च्या कार्यकर्त्यांनो,बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका…
निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ
मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ
बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 22, 2020
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केले आहे. “पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”.
कसा आहे नवा झेंडा?
मनसेकडून दोन झेंडे तयार केले आहेत. दोन्ही झेंडे भगव्या रंगातले आहेत. या एका झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असून दुसऱ्यावर निवडणूक चिन्ह इंजिन आहेत.हे दोन्ही प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे या बदलाने मनसेला किती यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.