नालासोपारा पश्चिमेतील फन फिएस्टा ( Fun Fiesta Mall) या सिनेमागृहात घुसलेल्या दहशतवाद्यांवर पालघर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटकेत घेतले आहे. या कारवाईचा नागरिकांनी स्वत;हून अनुभव घेतला. विशेष म्हणजे हि कुठली दहशतवादी घटना नव्हती, पोलिसांचे ते मॉकड्रिल होते.
पालघर पोलीसांनी फन फिएस्टामध्ये मॉकड्रिलचे आयोजन केले होते. त्यानुसार त्यांनी आपलेच काही सहकारी असे 4 दहशतवादी म्हणून सिनेमागृहात पाठवले होते.हे दहशतवादी काहीहि करू शकतात. जसे एखाद्यावर बंदूक रोखने अथवा मोठा हल्ला करणे.त्यांना पोलीस कसे रोखते हे दाखवण्यात आले.
दरम्यान या दहशतवाद्यांना कशाप्रकारे पोलीस पकडते याचा अनुभव नागरिकांनी घेतला. तसेच अशा परिस्थितीत नागरिकांनी कसे सतर्क रहावे अशी माहिती मॉकड्रिलमध्ये देण्यात आली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर व इतर पोलीस अधिकारी हि मोहीम राबवत होते.