वसईतला गावात असलेला हा चार रस्ता अपघातांना आमंत्रण देतोय. नुकतीच एका टेम्पोने दुचाकीला भीषण धडक दिली होती. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. हि घटना सीसीटीव्हीत हि कैद झाली होती. त्यामुळे सततच्या होणाऱ्या अपघाताने वाहनधारक त्रस्त झाले असून सदर ठिकाणी गतीरोधक बसवण्यात यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
देव तलाव येथील स्वागत सर्व्हीस सेंटर जंक्शन येथे सोमवार 20 जानेवारीला दुपारी 12.15 वाजता अपघात झाला. या जंक्शन वर भरधाव वेगात असलेल्या टेंम्पोने भरधाव वेगात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. टेंम्पोच्या धडकेने दुचाकी स्वार काही अंतरावर दुर फेकला गेला. सुदैवाने या अपघातात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला नसुन थोडक्यात बचावला आहे.
गेल्या तीन महिन्यात दुसरा अपघात
गेल्या तीन महिन्यातील याच जंक्शनवर अशा प्रकारचा अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. सदर अपघात झालेला दुचाकीस्वार हा गण नाक्यावरुन आक्तन येथे जात होता, तर त्याचवेळी टेम्पोचालक मडीपासून देव तलाव येथे जात होता. यावेळी टेम्पोचालकालाभरधाव वेगात असल्याने त्याला दुचाकी स्वार दिसलाच नाही त्यामुळे हा अपघात झाला.
दरम्यान याआधी सुद्धा एका दुचाकी स्वाराबरोबर एक घटना घडली होती. यामध्ये कार चालक गाडीला ठोकणार होता इतक्यात दुचाकी भरधाव वेगाने गटारात गेल्याने धडक बसली नव्हती. त्यामुळे असे रोजचेच अपघात घडत आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी प्रकरण मात्र गंभीर आहे. त्यामुळे अपघातांवर आवर घालण्यासाठी त्या चारही रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत अशी मागणी वाहन धारकांमधून जोर धरतेय.