Ads
स्पोर्टस

इंटरनेटच्या सर्वाधिक सर्चमध्ये ‘या’ खेळाडुचा विक्रम

डेस्क desk team

एका टाईपवर जगभरातल्या कोणत्याही काना कोपऱ्यातील अगदी कोणत्याही विषयाची माहीती देणाऱ्या माहितीच्या इंटरनेटचा दररोज कोट्यावधी लोक वापर करत असतात. याच लोकांनी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेला खेळाडु हा भारतीय क्रिकेट टिमचा कर्णधार विराट कोहली ठरला आहे.

अनुष्का शर्मा सोबतची रिलेशनशीप, त्यानंतर लग्न, जाहिराती, स्टाईल आयकॉन आणि आपल्या तुफानी फटकेबाजी मुळे नवनवीन विक्रम प्रस्थापित करणारा विराट कोहली हा इंटरनेट जगतावर सर्वाधिक सर्च झालेला खेळाडु ठरला आहे. एसईएमरस स्टडीनुसार विराट कोहलीला डिसेंबर 2015 ते डिसेंबर 2019 या कालावधीत सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

विराट नंतर यांचा नंबर

एसईएमरस स्टडीनुसार विराट कोहलीला एका महिन्यात तब्बल 17.6 लाख वेळा सर्च करण्यात आले आहे. तर याच संशोधनानुसार विराट नंतर महेंद्रसिंग धोनीला 9.59, रोहीत शर्माला 7.33, सचिन तेंडुलकरला 4.51, हार्दिक पांड्याला 3.68 वेळा तर युवराज सिंगला 3.48 वेळा सर्च करण्यात आले आहे. विराट नंतर अनुक्रमे या सगळ्यांचा नंबर लागतो. या सर्वेनुसार पहिल्या टॉप 10 खेळाडुंच्या यादीत तीन परदेशी खेळाडु वगळता सात भारतीय खेळाडुंचा समावेश आहे. स्टीव्ह स्मिथ, अब्राहम डिविलियर्स, क्रिस गेल या तीन परदेशी खेळाडुंचा समावेश आहे.

सर्वाधिक सर्च केलेली टिम

गेल्या अनेक वर्षांपासून भारताने केलेल्या सातत्य पुर्ण कामगिरिमुळे आणि भारतात असलेल्या मोठ्या प्रमाणातील क्रिकेट चाहत्यांमुळे भारतीय टिमचा नेहमी जगभरात बोल बाला राहिला आहे. गेल्या एक दशका पेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या इंडियन क्रिकेट लिग म्हणजेच आयपीयलमुळे भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये आणखी भर घातली गेली आहे. मात्र तरीही सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या टिम मध्ये इंग्लड संघ अग्रस्थानी आहे. इंग्लंडच्या टिमला सर्वाधिक 3.51 लाख वेळा आणि भारतीय टिमला 3.09 लाख वेळा सर्च करण्यात आले आहे.

आयसीसी पुरस्कारात भारतीय टिमचा बोलबाला

दरम्यान, 2019 सालच्या आयसीसी पुरस्कारांमध्ये देखील भारतीय खेळाडुंचा बोलबाला पाहायला मिळाला. भारताचा सलामीवीर हिटमॅन रोहीत शर्माला आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ दि इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर विराट कोहलीला आयसीसी स्पिरीट ऑफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 20-20 क्रिकेट मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार यजुवेंद्र चहलला देण्यात आला.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: