सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी आनंददायी बातमी आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील महानगर पालिकांतर्गत विविध जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मुंबईसाठी असून येत्या 31 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या भरतीचा लाभ उठवावा.
पद, जागा आणि शैक्षणिक पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदव्यूत्तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण जागांसाठी भरती असणार आहे. यासाठी MBBS, MD / MS/ DNB या अभ्यासक्रमांची पदवी आणि 1 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा आणि शुल्क
सदर भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीयांसाठी वयो मर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवाऱ्यांना 600 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 300 रूपये असणार आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण
के.बी.भाभा मनपा सर्वसाधारण रूग्णालय, बांद्रा (प.), 7 वा मजला, डॉ. आर.के.पाटकर मार्ग, मुंबई – 400050
अधिक माहितीसाठी- पाहा