संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा निर्भया समुहिक बलात्कार प्रकरणातील 4 गुन्हेगारांना येत्या 22 जानेवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. तर सदर प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी एक तज्ञ जल्लादाचे तिहार जेलकडे पाचारण करण्यात आले आहे. फाशी देण्यासाठी कोणत्याही जल्लादाला निवडले जात नाही तर पिढीजात काम करणाऱ्या व्यक्तीलाच प्राधान्य दिले जाते. यावेळी फाशीसाठी निवडण्यात आलेल्या जल्लादाचे नाव आहे पवन कुमार.
जल्लाद पवन कुमार यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या कुटुंबाचा 1951 सालापासून हा व्यवसाय आहे. पवन यांच्या आजोबांनी इंदिरा गांधी यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना 1987 साली फाशी दिली होती. तसेच त्यांचे आजोबाच नाही तर त्यांचे वडिलही हाच व्यवसाय करायचे. तर आता पवन हे स्वत: जल्लाद या व्यवसायात कार्यरत आहे. तसेच ही फाशी देण्यासाठी त्यांना 1 लाख रूपये मोबदला देण्यात येणार आहे.
फाशी देण्याच्या प्रक्रियेमध्ये जल्लाद हा महत्वाची भूमिका बजावत असतो. जल्लाद कैद्याच्या जवळ शेवटच्या क्षणापर्यंत असतो. त्यामुळे सर्वात कठीण काम हे जल्लाद करत असतो. तसचे फाशी देण्याचे काही नियम आहेत आणि ते नियम पाळल्या शिवाय फाशीच्या शिक्षेची प्रक्रिया पूर्ण होत नाही. तर पाहुयात काही नियम…,
- जेव्हा एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली जाते तेव्हा न्यायालयात पेनाची निब तोडली जाते. कारण त्याचे आयुष्य संपले असते.
- तसेच फाशीच्या वेळी जेल अधीक्षक, कार्यकारी दंडाधिकारी, फाशी देणारा जल्लाद व डॉक्टर उपस्थित असतात.
- तसेच फाशी पहाटेच्या वेळेसच दिली जाते. कारण सकाळ्या वेळेस कैद्यांचा कामात व्यत्यय येत नाही.
- फाशी देण्यापूर्वी कैद्याला आंघोळ घातली जाते आणि त्याला नवीन कपडे घातले जातात.
- कैद्याला फाशी देण्याआधी त्यांची शेवटची इच्छा विचारली जाते. त्या इच्छेमध्ये कुटुंबियांना भेटण्याची किंवा चांगले जेवण्याची इच्छा असेल तर ती मान्य केली जाते.
- त्यानंतर जल्लाद गुन्हेगाराच्या कानांत काही तरी म्हणून दोरखंड सोडून देतो. मात्र, जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय म्हणतो हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर जल्लाद त्या गुन्हेगाराच्या कानात त्यांच्या धर्मानुसार नमस्कार करतो आणि मी माझ्या कामापुढे हतबल असून तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल अशी प्रार्थना करतो.