Ads
मुलाखत

Ironman Hardik Patil ; भावी पिढीचे खरेखुरे ‘आयर्नमॅन’

देशाची भावी पिढी पब्जीच्या वेडापायी मैदानी खेळ सोडून हॉलीवूड चित्रपटातील सुपरहिरोंपैकी ‘आयर्नमॅन’ला आपला हिरो मानत असतानाच, पालघरच्या हार्दिक पाटील यांनी जगभरातील अतिशय खडतर अशी सलग 17 तासांची स्पर्धा पार करून ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला. जवळपास 10 वेळा ‘आयर्नमॅन’ हा किताब आपल्या नावी केल्याने हार्दिक पाटील तरुणांचे खरेखुरे ‘आयर्नमॅन’ ठरले आहेत. यानिमित्ताने बातमीदारने ‘आयर्नमॅन’ हार्दिक पाटील यांची खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्याने आयर्नमॅन होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्याला आलेले अनुभव शेअर केले आहेत.

खासकरून विदेशात होणारी हि स्पर्धा सलग 17 तासांची असते. यामध्ये स्विमिंग, सायकलिंग व रंनिग होते. अशा या स्पर्धेत हार्दिक पाटीलने तब्बल 10 वेळा भारताचा झेंडा साता समुद्रापार फडकावला आहे. या कामगिरीने तो भारतातील दुसरा आणि मुंबईसह पालघर जिल्ह्यातील पहिला आयर्नमॅन ठरला आहे.

स्पर्धेचा थरारक अनुभव

मेक्सिको इथल्या आयर्नमॅन स्पर्धचा अऩुभव शेअर करताना हार्दिकने सांगितले की, या स्पर्धेदरम्यान स्वीमिंग करताना त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. तरीही हार्दिकने खुप कमी वेळात स्विमिंग पुर्ण करत रनींगकडे वळलो. मात्र रनिंगमध्ये प्रत्येक पाऊल टाकताना वेदना होत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करत हार्दिकने स्पर्धा पुर्ण करण्याच्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकले. केवळ जिद्द आणि स्पर्धा पुर्ण करण्याचा घेतलेला ध्यास हार्दिकला यशाच्या त्या रेशेपर्यंत घेऊन गेला. ( विरारच्या हार्दिक पाटिल यांनी पटकावला ‘फूल आर्यनमॅन’ किताब! ) 

मराठमोळा आयर्नमॅन

तर याच मॅक्सीको आयर्नमॅन स्पर्धत गेल्यावर्षी हार्दिक धोतर आणि कुडता अशा मराठमोळ्या पोशाखात धावला होता. यामुळे विदेशींसह प्रतिस्पर्धी खेळाडूंचे लक्ष वेधुन घेतले होते. आम्ही भारतीय कुठे ही कमी नाही आहोत, त्याचबरोबर एक मराठी माणूस काय करु शकतो हे जगाला दाखवुन देण्यासाठी हार्दिकने हा आगळा वेगळा प्रयत्न केल्याचे त्याने यावेळी सांगितले.

फिटनेस मंत्र 

स्पोर्टसमध्ये करीयर करणाऱ्यांसाठी फिटनेसचा कानमंत्र दिला. स्पोर्टस असो अथवा इतर कोणतही क्षेत्र असो, कितीही व्यस्त असाल तरी दिवसातला किमान एक तास तरी फिटनेससाठी द्या. कोणतही यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत, जिद्द आणि आपला फोकस किती महत्वाचा आहे हे देखील त्याने सांगितले. तसेच आपल्या आयर्न फिटनेस क्लबमधुन पालघर जिल्ह्यातुन सक्षम असलेले आयर्नमॅन घडवण्यासाठी लागणार ट्रेनिंग आणि फायनान्सची व्यवस्था करणार असून, आयर्नमॅन फिटनेस क्लब जॉइंट करण्याचे आवाहन हार्दिकने तरुणांना केले.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: