भारतीय संघासाठी आणि सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मासाठी रविवारचा दिवस हा खास ठरला. रोहितने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन दिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात शानदार शतकी खेळी केली. हिटमॅनने कांगारूंच्या गोलंदाजांचा समाचार घेत वन-डे कारकिर्दितील 29 व्या शतकाची नोंद केली. भारताने कांगारूंना 287 धावांवरच थांबले आणि त्याचा पाठलाग करत रोहितने आपली शतकी खेळी केली. तर रोहित सह लोकेश राहुल आणि विराट कोहलीने ही महत्वपूर्ण भागीदारी करत विजयासाठी महत्वाची भूमिका बजावली.
💯
Here it is! 29th ODI hundred for @ImRo45 and his eighth against Australia.
Live – https://t.co/VThwmeOEBJ #INDvAUS pic.twitter.com/rALfE9vr67
— BCCI (@BCCI) January 19, 2020
हिटमॅन रोहितचा ऑस्टेलिया संघा विरूद्धचे हे आठवे शतक ठरले आहे. या शकतामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केली आहे. तर कांगारूंविरूद्ध सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 शतक पटकावली आहेत.
Most Odi 100s against Australia
Sachin – 9
Rohit – 8*
Kohli – 8#INDvsAUS— CricBeat (@Cric_beat) January 19, 2020
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करत रोहितने सुरूवातीच्या 4 धावातच वन-डे मालिकेतील आपल्या 9 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.