Ads
ओपन मांईड

‘या’ देशाच्या नोटीवर आहे गणपती बाप्पाचा फोटो!

Indonesia Rupiah
डेस्क desk team

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था सुलभ होण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापा असे व्यक्तव केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकास्त्र सोडली. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? जगात असा एक मुस्लीम देश आहे जिथे नोटांवर हिंदू धर्माचे दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचा फोटो आहे. या देशाचे नाव आहे इंडोनेशिया. या देशातील चलन भारतातील चलनाप्रमाणे असून त्यांचे व्यवहारही रूपयांमध्येच होतात.

का घेतला हा निर्णय?

काही वर्षांपूर्वी इंडोनेशिया देशाची अर्थव्यवस्था ढासळली होती. त्यावेळी प्रचंड विचार करून 20 हजार रूपयांची नोट चलनामध्ये आणण्याचा आणि त्यावर गणपतीचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर तेथील नागरिकांनी असे म्हंटले होते की, जेव्हा पासून गणपती बाप्पाचा फोटो 20 हजारा रूपयाच्या चलनावर छापला आहे तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.

नोटेवर काय?

इंडोनेशिया या देशातील लोकसंख्येच्या तब्बल 87 टक्के नागरिक हे मुस्लीम आहेत. तर अवघे 3 टक्के नागरिक हे हिंदू आहेत. असे असले तरी या देशातील 20 हजाराच्या चलनी नोटेवर पुढील बाजूवर गणपती बाप्पाचा तर मागील बाजूस क्लासरूमचा फोटो आहे. यासोबतच नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे.

Indonesian currency

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: