रेल्वे प्रशासनाकडून दरवेळी प्रमाणे येत्या रविवारीही रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे . हा ब्लॉक मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्र कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे रविवारी ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा स्थानका दरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक जाहीर केलाय.
परिणाम
- ब्लॉक काळात अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
- तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल फेऱ्या 20 मिनिटे उशीराने धावणार आहे.
Railway Megablock on 19th January 2020, Sunday@Central_Railway @WesternRly pic.twitter.com/rd94RskJzD
— m-Indicator (@m_indicator) January 18, 2020
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी स्थानका दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- ब्लॉकमुळे बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या दोन्ही अप-डाऊन मार्गावरील आणि पनवेल-अंधेरी आणि ट्रन्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल-ठाणे लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत.
विशेष रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान आज रात्री 11.45 ते पहाटे 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- ब्लॉक काळात चर्चगेट दिशेकडे जाणाऱ्या जलद लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर धावणार आहेत.
No Day Block on WR on 19/01/2020. A night block will be taken from 23.45 hrs to 03.45 hrs during the intermittent night of Saturday, 18th Jan & Sunday, 19th Jan, 2020 on Up fast & 5th line between Matunga Road & Mumbai Central (Local) stations for maintenance work. #WRUpdates pic.twitter.com/dok7Plitpk
— Western Railway (@WesternRly) January 17, 2020