मुंबईकडून खेळताना ज्याने अनेक सामने आपल्या फलंदाजीने गाजवले, आपल्या उत्तम फलंदाजीने ज्याने अनेक विक्रम स्वतच्या नावावर केले. असा भारतीय क्रिकेट टिम मधील एक नावाजलेला आणि नेहमी याना त्या कारणानी चर्चेत राहणाऱ्या विनोद कांबळीचा आज 48 वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसा निमित्त बातमीदार तर्फ त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
664 धावांची भागीदारी
18 फेब्रुवारी 1972 साली विनोद कांबळीचा मुंबईत जन्म झाला. सचिनच्या आंतराष्ट्रीय पदार्पणाच्या तीन वर्षांनंतर विनोद कांबळीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर 2009 साली विनोद कांबळीने निवृत्ती घोषीत केली. सन 1988 साली हॅरीस शिल्डमध्ये सचिन- विनोद कांबळी या जोडीने सेंट झेवियर्स शाळेविरूद्ध उपांत्य सामन्यात खेळताना तब्बल 674 धावांची विक्रमी खेळी केली होती. यात सचिनच्या 325 धावा होत्या, तर कांबळीच्या नाबाद 349 धावा होत्या. यावेळी कांबळी 16 तर सचिन अवघ्या 15 वर्षांचा होता. क्रिकेटच्या दुनियेत या जोड गोळीने अनेक फलंदाजांवर आपल्या फलंदाजीने हल्ले चढवले.
व्दिशतकांचा विश्वविक्रम
कांबळीने केवळ 1993 ते 1996 या कालावधित केवळ 17 कसोटी सामने खेळले. मात्र पदार्पणाच्या दुसऱ्याच सामन्यात त्याने इंग्लंड विरुद्ध पहिले व्दिशतक ठोकले. तर त्याच्या पुढच्याच सामन्यात त्याने झिंबॉम्बे विरुध्द आणखी एक व्दिशतक ठोकले. तर पुढच्याच सामन्यात श्रीलंके विरुद्ध शतकी खेळी करुन तीन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध 100 पेक्षा आधिक धावा करण्याचा विक्रम त्याने स्वतच्या नावे केला. क्रिकेट विश्वचषकाच्या 1992 आणि 96 सालच्या टीमचा कांबळी एक भाग होता. 10996 ला विश्वचषकातल्या सामन्यात त्याने तिन गडी झटपट बाद झालेले असताना महत्वपुर्ण शतकी खेळी केली होती.
आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत अनेक विक्रम आणि आक्रमक फलंदाजीने कांबळी नेहमीच चर्चेत राहिला. 2009 साली ज्या सामन्यात कांबळीने निवृत्ती जाहिर केली, त्याच सामन्यात युवराज सिंगचे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन झाले.