देशातील सर्वाधीक दुचाकी वाहने विकली जाणारी हीरो मोटोकॉर्पने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.कंपनी आपल्या बाईकच्या BS 4 व्हेरिएंटवर फायदे देत आहे. एप्रिलपासून BS 6 एमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर स्टॉक क्लिअर करण्यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यामध्ये हीरोच्या बाईक्सवर कंपनी कॅशबॅक ऑफर्स देत आहे. तुम्ही EMI वर बाईक घेत असाल तर तुम्हाला 6.99 टक्के व्याजदर भरावा लागणार आहे.BS6 मॉडेलची किंमत BS4 पेक्षा 8 हजार रुपयांनी जास्त असणार आहे. तर BS 4 मॉडेल 8 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत असणार आहे.
या मॉडेल्सची विक्री : Xpulse 200, Xpulse 200T, Xtreme 200S, Xtreme 200R, Karizma ZMR, Xtreme Sports, Achiever 150, Glamour, Super Splendor IBS, New Super Splendor IBS, Passion, Splendor iSmart IBS, HF Deluxe IBS i3S
स्कुटर : Destini 125, Duet, Maestro Edge, Maestro Edge 125, Pleasure, Pleasure या मॉडेल्सचा समावेश आहे.