बऱ्याचदा लोक बँकिंग फ्रॉडचे बळी झाल्यानंतर कार्ड बंद करण्यासाठी कस्टमर केअरला कॉल करावा ला. आरबीआयच्या नवीन सुविधेने आपण स्वतः कार्डला स्विच ऑन व स्विच ऑफ करू शकतो. त्यासाठी कस्टमर केअरला कॉल करण्याची गरज नाही. आपण स्वतः कार्ड बंद करू शकतो.
सुविधा : आरबीआयने बँक व कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांना डेबिट अथवा क्रेडिट कार्ड स्वतः बंद करणे आणि सुरू करण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे.
आरबीआयने सांगितले :
- ग्राहकांना या प्रकारची सुविधा मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनसारख्या माध्यमातून मिळू शकते. ही सुविधा 24 तास असावी.
- जे कार्ड आतापर्यंत ऑनलाईन पेमेंटसाठी वापरले नाहीत, ते या प्रकारच्या व्यवहारासाठी बंद करवेत. या निर्णयाने कार्डद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.