‘आधारकार्ड’ प्रमाणेच ‘पॅनकार्ड’ हे आर्थिक व्यवहारासाठी महत्वाचे आणि अत्यावश्यक कागदपत्र मानले जाते. मात्र, गेले काही वर्ष एकापेक्षा अनेक पॅनकार्ड तयार करून गैरव्यवहार केला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण अशा लोकांना केंद्र सरकारने चांगलाच धडा शिकवत सरकाने अनेक पॅनकार्ड रद्द केली आहे. यामुळे सगळ्यांच्याच मनात आपला पॅनकार्ड वैध आहे का? हा प्रश्न घोळत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमचा पॅन कार्ड वैध आहे की अवैध हे कसे पाहायचे हे सांगणार आहोत.
- सर्वप्रथम आयकर विभागाच्या http://www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फायलिंगच्या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर होम पेजवर ‘सर्व्हिसेस’ या मथळ्याखाली ‘Know Your PAN’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- एक नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, धर्म, स्टेटस यांसारखी माहिती भरुन द्यावी लागणार आहे.
- तुम्ही जो मोबाईल नंबर भरा. जेव्हा पॅन कार्डचा फॉर्म भरताना तुम्ही जो नंबर दिला होता तोच हा नंबर आहे की नाही याची खात्री करून घ्या.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडेट या बटणावर क्लिक करा.
- तुमच्या माहितीवर एकाहून अधिक पॅनक्रमांक रजिस्टर केलेले असतील तर तुमच्या नावावर एकाहून अधिक पॅनकार्ड असून जास्तीची माहिती द्या अशी नोटीस तुमच्या स्क्रीनवर पॉप-अप होईल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव किंवा इतर अनेक प्रश्न विचारण्यात येतील.
- विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाल ज्या ठिकाणी तुमचे पॅनकार्ड व्हॅलिड आहे की नाही हे समजेल.