देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभेसाठीच्या निवडणुकांकडे सध्या देशाच लक्ष लागलेल आहे. मात्र अशातच एका निवडणुकीने अवघ्या देशाच लक्ष वेधलय. त्याच कारण देखील तसेच आहे, कारण या निवडणुकीत 97 वर्षांच्या आजीबाई या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. निवडणुकीत केवळ उमेदवारी अर्ज भरून या आजीबाई गप्प बसलेल्या नाहीत, तर तरुणांनाही लाजवत आजीबाई घरोघरी प्रचार करत असल्याने त्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. ही निवडणुक कुठे आहे, कोणत्या पदासाठी आहे, याची उत्सुकता तुम्हालाही असेलना मग वाचा.
सरपंच पदासाठी निवडणुक
राजस्थानच्या सीकर येथे पंचायत समीतीच्या निवडणुका सुरु असून, यामध्ये निमका या ठिकाणी या 97 वर्षांच्या आजी बाईंनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विद्या देवी असे या आजीचे नाव असून, त्यांनी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरवात केली आहे. या आजीबाईंची थेट लढत गावाच्या विद्यमान सरपंच सुमद देवींशी आहे. तर अन्य तीन महिला झनकोरी देवी, वीमला देवी आणि मीना या तीन उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 11 वॉर्ड असलेल्या या विभागात 9 ठिकाणी बिनविरोध सरपंच निवड झाली आहे.
म्हणून आजीबाई लढवतायत निवडणुक
विद्या देवी यांचे पती मेजर शिवराम सिंह हे देखील 55 वर्षांपुर्वी सरपंच म्हणून बिनविरोध निवडुन आले होते. तर त्यांचे सासरे सुभेदार सोडुराम यांनी 20 वर्षे गावाचा सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला होता. तर विद्यादेवींचे नातू मोंटु सिकर वॉर्ड क्रमांक 25 मधुन जिल्हा परिषदेवर निवडुन गेले आहेत. दरम्यान, आपले सासरे आणि पती यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. आपण ही गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी ही निवडणुक लढत असल्याचे त्या लोकांना सांगतात.