चंद्रपुरच्या रस्त्यांवर वाघांची जोडी रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ ताजा असतानाच आता कान्हा जंगलातला दोन वाघांच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अनेक प्राणी प्रेमींनी काही वेळातच या व्हिडिओला अनेक लाईक मिळवुन दिले आहेत, पाहा हा वाघांच्या झुंजीचा व्हिडिओ.
पाहा व्हिडिओ
दोन वाघांमधील झुंज या व्हिडिओमध्ये प्राणी प्रेमींना पाहायला मिऴाली आहे. वाघांची अशा प्रकारे झुंज पाहायला मिळणे हे दुर्मिळच दृश्य आहे. भारताच्या मध्य प्रदेशमधील कान्हा जंगलातला हा वाघांच्या झुंजीचा व्हिडिओ आहे. कान्हा जंगलात सफरीसाठी गेलेल्या एका पर्यटकाने काढलेला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये वाघाने रागाने फोडलेल्या डरकाळ्यांचा आवाज स्पष्ट एकायला येत आहे. या व्हिडिओमध्ये अगदी काही अंतरावरच दोन जिपमध्ये या जंगलाची सफर करताना काही लोक आल्याचे दिसत आहे.
Territorial fight between two full grown #tigers. Listen with headphones. The powerful Roar and it's echo from Indian #forests. Forwarded via Whatsapp by friend. pic.twitter.com/YazNX2DLbS
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 14, 2020
या सफरी साठी आलेल्या या लोकांना वाघांची अशा प्रकारे झुंज पाहण्याचा हा योग आला असून, ते व्हिडिओ ग्राफी करताना दिसत आहे. भारतीय वनाधिकारी परवीण कसवन यांनी हा व्हिडिओ त्यांच्या व्टिटर आकाऊंटवरुन शेअर केला आहे. वाघाच्या डरकाळीने थरकाप उडवणाऱ्या या व्हिडिओला एका दिवसात लाखाच्या आसपास लाईक्स मिऴाले आहेत.