Ads
मेजवानी

मस्त! मेथीचे मुठीए

डेस्क desk team

साहित्य :

एक मेथीची जुडी, धने, जिरे, ओवा, बडीशेप, खसखस अंदाजे भाजून, जाडसर पूड, तीळ, चिचेचा कोळ, गूळ, हि. मिरच्या 3 व लसूण पाकळ्या 2/3 वाटून, अर्धी वाटी रवा, बेसन, चिमूटभर सोडा, तळण्यासाठी तेल.

कृती :

  • मेथीची भाजी नीट करून फक्त पाने घ्यावीत व स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. त्यात मसाला पूड, गूळ, चिंचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे. रवा व बेसन पीठ एकत्र करावे. त्यात सोडा व तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ हाताने चोळून घ्यावे.
  • मग भाजीचे मिश्रण व पीठ एकत्र करावे व घट्ट भिजवावे. पाणी घालू नये. भाजीत बसेल एवढे बेसन घालावे. चांगले मळून घेऊन लांबट गोळे करून मंद गॅसवर लालसर होईपर्यंत तळावे. या साहित्यात मेथी मुठिया प्रमाणेच कोबी, दुधी, गाजर अशा भाज्या किसून घालूनही मुठिया छान होतात.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: