ऑनलाईन कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्मवरील 2 हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी ओटीपी बंद करणार आहे. यामुळे ट्रांजेक्शन करणे सोपे होणार आहे.
ई-कॉमर्स साइटवरून काढले : फ्लिपकार्टने 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी ओटीपी ऑथेंटिकेशन पुर्णपणे काढले आहे. आता स्विगी, ओला आणि उबर या कंपन्या देखील हे स्विकारण्याच्या तयारीत आहे.
आरबीआयने ऑनलाईन पेमेंट सोपे करण्यासाठी देशातील बँकांना ओटीपी ऑथेंटिकेशन हटवण्याला मंजूरी दिली होती.पेटीएमचे वाइस प्रेसिडेंट पुनीत जैन यांनी देखील क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या पेमेंटसाठी ओटीपी हटवण्यास तयार असल्याचे म्हटले, मात्र कंपनीने याविषयी अजूनही अधिकृत माहिती दिली नाही.