‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटाची प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी घोषणा केल्यापासून याची सर्वत्र चर्चा रंगली होती. तर नुकताच या चित्रपटाचा फस्ट लुक सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रमुख भुमिकेत लोकप्रिय अभिनेत्री आलीया भट्ट दिसणार आहे. आलीया या तिच्या आगामी चित्रपटातील वेगळ्या धाटणीच्या भूमिकेतून मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
आलीया भट्ट हिने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये आलीयाने ब्लाऊज आणि लाल रंगाचा स्कर्ट घातला आहे. तिच्या बाजूला एक पिस्तोलही दिसते. याशिवाय मोठे लाल कुंकू आणि हिरव्या बांगड्या आलियाने घातलेल्या दिसत आहे.
तर दुसऱ्या पोस्टरमध्ये आलीया ‘माफिया क्वीन’च्या रूपात दिसत आहे. त्यात आलीयाने माथ्यावर लावलेल्या लाला कुंकवाकडे लक्ष जात आहे.
दरम्यान, गंगुबाई कामाठीपुरा यांना द मॅडम ऑफ कामाठीपुरा या नावाने ओळखले जाते. त्यांच्या जीवनाभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. गंगुबाई यांना लहान असतानाच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. गंगुबाई या व्यावसायात असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करायच्या व त्यांच्या हक्कासाठीही लढा दायच्या. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. हे सारे काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्नीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. येत्या 11 सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.