वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज अचानक काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे बस सेवा ठप्प झाली असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या आंदोलनात 300 च्या वर कंडक्टर आणि चालक सहभागी झाले आहेत.
परिवहन विभागाच्या कर्मचार्यांनी आज सकाळपासून वसईच्या डेपोत बस लावून ठिय्या मांडत कामबंद आंदोलन पुकारले.मात्र या आंदोलनाची प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. दरम्यान कामगारांचा पगार रखडल्याने कर्मचार्यांनी हे आंदोलन पुकारल्याची माहिती आहे.
कामगारांचे पगार प्रलंबित असल्याने आज सकाळी कर्मचाऱ्यानी ठिय्या मांडून एकही बस रस्त्यावर धावू न देण्याचा निर्धार केला. तसेच पगार जिथपर्यत मिळत नाही तिथपर्यत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात जवळपास 300 च्या वर कंडक्टर आणि चालक सहभागी झाले आहेत.