मुंबईत टॅक्सी हे वाहन प्रवास करताना महत्वाची भूमिका बजावत असते. मात्र, काहीवेळा टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे किस्से आपल्या समोर येतच असता. हे वाद काहीवेळा टॅक्सी रिकामी नसली तरी नागरिक हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न करतात, तर काहीवेळा टॅक्सी रिकामी असूनही चालक टॅक्सी थांबवत नाही व सुसाट निघून जातो. या कारणांमुळे टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र, या वादाला आवर घालायला आणि त्यांच्या सोयीसाठी आता टॅक्सी वर तीन रंगांचे दिवे लावले जाणार आहे. ही माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली आहे.
टॅक्सीवर लावण्यात येणाऱ्या दिवांबद्दल बोलायचे झाले तर, यात लाल, हिरवा आणि सफेद अशा तीन रंगांचे दिवे लावण्यात येणार आहे. लाल रंगाचा दिवा टॅक्सीवर चालू असल्यास टॅक्सीत आधिच प्रवासी असल्याचा प्रवाशांना कळेल. तर हिवारा रंगाचा दिवा चालू असेल तर प्रवाशांसाठी उपलब्ध असल्याची ही निशाणी असणार आहे. तर सफेद रंगाचा दिवा चालक प्रवासासाठी उपलब्ध नसल्याचे संकेत असणार आहे.
दरम्यान, टॅक्सीवरील तीन दिव्यांची योजना येत्या 1 फेब्रुवारपासून अंमलबजावणी होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून रजिस्टर होणाऱ्या नव्या टॅक्सीना हा नियम लागू होणार आहे. तर सध्या मुंबई शहरात प्रवासासाठी उपलब्ध असणाऱ्या टॅक्सींवर टप्प्याटप्प्यांनी दिवे लावले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.