Ads
बातम्या

‘या’ दोन पॉवरफुल स्मार्टफोनवर जबदस्त सुट

Redmi K20 and Redmi K20 Pro
डेस्क desk team

‘शाओमी’ ही लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवे फिचर्स असणारे स्मार्टफोन्स बाजारात आणत असते. गेल्यावर्षी कंपनीने शाओमीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन ‘Redmi K20’ आणि ‘Redmi K20 Pro’ लाँच केले होते. आता हे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे. या दोन स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना दोन हजारांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यामुळे रेडमी के 20 हा स्मार्टफोन 17 हजार 999 रूपयात तर रेडमी के 20 प्रो स्मार्टफोन 22 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

यासंबंधीत माहिती शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालकल मनू कुमार जैन यांनी एक ट्विटरवर पोस्ट करत दिली आहे. या द्विटमध्ये त्यांनी असे म्हंटले आहे की, ब्लॉकबस्टर ‘रेडमी के20’ सीरीज 17 जानेवारीपर्यंत दोन हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट सह उपलब्ध आहे. तुम्ही mi.com, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि रिटेल आउटलेट्समध्ये एसबीआय कार्ड्सवर ईएमआयचा वापर करून या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

Redmi K20 आणि K20 Pro च्या फिचर्सवर एक नजर

  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
  • रेडमी के 20 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर तर रेडमी के 20 प्रोमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर
  • अँड्रॉयड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित MIUI 10 सपोर्ट
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 48+13+8 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएच क्षमतेची बॅटर

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: