शरीरात अतिप्रमाणात उष्णता निर्माण झाली की अनेकवेळा आपल्या तोंडात फोड येतात. या फोडांना सर्वसाधारणतः तोंड येणं असं म्हटलं जातं.
तोंड येण्याची कारणे –
▪ तोंडात एखादी जखम होणं
▪ महिलांना मासिक पाळीच्या अगोदर हार्मोन्समध्ये बदल झाल्याने
▪ शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता
▪ मानसिक ताणतणाव
▪ अपुरी झोप
▪ तोंडातील जंतूंमुळे अलर्जी झाल्याने
उपाय –
▪ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घ्या
▪ तोंड आलंय तिथे थोडावेळ बर्फ लावावा
▪ व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन बी12 च्या सप्लिमेंट्स घ्या
ही पथ्ये पाळा –
▪ आबंट चवीची फळं जास्त प्रमाणात सेवन करू नका. संत्री, लिंबू इत्यादी.
▪ मसालेदार पदार्थ खाऊ नका.
▪ तोंडाची स्वच्छता राखा
▪ पुरेसा आराम आणि झोप घ्या.
▪ पोट साफ ठेवा.