Ads
बातम्या

Mega Block : मध्य रेल्वेवर ब्लॉक; या गाड्या रद्द!

Central Railway mega block
डेस्क desk team

मध्य रेल्वेने तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घोषित केला आहे. हा ब्लॉक मंकी हिल ते कर्जत दरम्यानच्या अप मार्गावर येत्या 15 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत घेण्यात आला आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.

या ब्लॉकसंबंधी रेल्वे प्रशासनाकडून असे सांगण्यात आले आहे की, राज्यात गेल्या वर्षात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे रेल्वे रूळाला तडे व अन्य तांत्रिक बाबींची काम पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.

रद्द गाड्या

  • गाडी क्रमांक 51317/51318 पनवेल-पुणे-पनवेल ही गाडी दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत रद्द.
  • 51027 सीएसएमटी-पंढरपुर ही गाडी दिनांक 16 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत रद्द.
  • 51028 पंढरपूर-सीएसएमटी गाडी दिनांक 17 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत रद्द.
  • 51029/51030 सीएसएमटी-बीजापूर-सीएसएमटी ही गाडी दिनांक 15 जानेवारी, 16 जानेवारी आणि 20 जानेवारीला रद्द.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्सप्रेस दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत पुणे येथे साप्ताहिक सुरू होणार आहे.

मार्गिकेत बदल

11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत मनमाड-दौंड या मार्गावरुन धावणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: