साधारण फिरत्या खाद्यपदार्थांच्या गाड्या व फिरत घर (अभिनेत्यांच्या व्हॅनीटी व्हॅन) तुम्ही पाहिल्या असतील, मात्र कधी तीन चाकीवरच फिरत घर पाहिलंय का ? नाही ना. तमिळनाडु मधल्या एका 23 वर्षीय तरुणान रिक्षावर अस भन्नाट घर थाटलय. जगातील हे असे, पहिले घर फिरते घर ठरले आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे फिरत घर त्याने कसे साकारले.
इतका खर्च आणि कालावधी
दरम्यान, ज्याने हे घर बनवले त्या 23 वर्षीय तरुणाचे नाव अरुण प्रभु असे आहे. हा तरुण बंगलोरच्या Billboards या स्टार्टअपमध्ये काम करतो. त्याने Bajaj RE रिक्षाचं रुपांतर घरामध्ये केलं आहे. हे घर साकारण्यासाठी अरुणला थोडे थोडके नव्हे तर लाखो रुपये खर्च आला. तसेच हे संपुर्ण रिक्षावरील फिरते घर साकारण्यासाठी त्याला सलग पाच महिने मेहनत घ्यावी लागली. अशा प्रकारचा काहीतरी वेगळा प्रयोग करायचे असे अरुणच्या डोक्यात होतेच. मात्र त्याच्या समोर ते कसे साकारायचे याची प्रतिकृती नव्हती. त्यामुळे त्याने जे साकारल ते स्वत:च्या अक्कल हुशारीनेच.

रिक्षेवर साकारले घर
अशी केली सुरवात
हे घर साकारण्यासाठीची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अरुणने त्याचे पद्धतशीर नियोजन केले. कुठे काय असेल, याचा विचार केला आणि वस्तु आणून कामाला सुरवात केली. त्याने सगळ्यात आधी रिक्षेचा मागचा भाग काढला आणि त्याजागी बसचे काही चौकोनी पार्टस वापरुन रुम तयार केला. त्यानंतर कुठे काय असेल या प्रमाणे विचार पुर्वक त्याने खाचे पाडले. त्याने अनेक छोट्या-छोट्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला.

घरात सगळ्या सोयी सुविधा
परिपुर्ण सोयी असलेल घर
या छोट्याश्या घरात अरुण ने एक बेडरुम तयार केले आहे. इतकच काय तर एक छोटस किचन, बाथरुम, टॉयलेटची सुविधा देखील त्याने केली आहे. त्याचबरोबर पाणी गरम करण्यासाठी हिटर, कपड्यांसाठी छोटस कपाट हे सगळ करुन सुद्धा वापरण्यासाठी जागा देखील आहे. कमाल म्हणजे त्याने घरावर 250 लिटरची टाकी देखाल बसवली असून, 600 व्होल्ट क्षमतेची सौर उर्जेची यंत्रणा त्यावर आहे. एका सर्वसामान्य माणसाला राहण्यासाठी उत्तम आणि सुसज्ज असे हे घर आहे.

सगळ्या सोयींनी परिपुर्ण घर