Ads
बातम्या

जीवदानी मंदिरातील रोप वे संदर्भातली ‘ती’ अफवाच!

डेस्क desk team

अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जीवदानी मंदिरात फनिक्युलर ट्रॉलीचे काम सुरू असताना दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सर्वत्र रोप वे तुटल्याची अफवा पसरली होती. मात्र ती अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले असून रोप वे सुरक्षित असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

जिवदानी मंदिरातील देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना पायऱ्या अथवा रोप वे ने जाता येते. तसेच वाढती भाविकांची संख्या पाहता मंदिर प्रशासनाने फनिक्युलर ट्रॉलीचे काम हाती घेतले होते. या ट्रॉलीसाठी रेल्वे लाईन बसवण्याचे काम करत असताना रविवारी सकाळी जयवंत हडळ (४५) सफाळे आणि गणेश वायडा (२३) या दोघांचा तोल जाऊन ते १० ते १५ फूट डोंगरावरून खाली कोसळून अपघात झाला होता. त्यांना तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद कऱण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली.

या घटनेनंतर जीवदानी मंदिरात रोप वे तुटून अपघात झाल्याची अफवा सर्वत्र सोशल मिडीयावर पसरली होती. यावर आता मंदिर प्रशासानाने स्पष्टीकरण दिले आहे. जीवदानी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गावड यांनी सांगितले कि, ट्रॉलीचे काम करताना तोल गेल्याने हे मजूर पडले, आम्ही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. तसेच मंदिरात भाविकांना जाण्यासाठी असलेला रोप वे मात्र सुरक्षित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: