Ads
स्पोर्टस

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

India team
डेस्क desk team

भारतीय संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या न्यूझीलंड दोऱ्यात भारतीय संघ 5 टी-20, 3 वनडे, दोन कसोटी सामने खेळणार आहे. या परदेशी दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यातून भारताचा सलामीवीर रोहीत शर्मा पूनरागमन करणार आहे.

दरम्यान पहिल्या टी-20 सामन्यासाठी कर्णधारपद विराट कोहलीकडे तर उपकर्णधारपद हिटमॅन रोहित शर्माकडे असणार आहे. या संघात संजू सॅमसन आणि गोलंदाज हार्दिक पांड्याला स्थान मिळाले नाही आहे. तर वनडे आणि कसोटी सामन्याच्या संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

पाहुयात टी-20 मालिकेचा संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर.

असा असेल सहा आठवड्यांसाठीचा न्यूझीलंड दौरा

टी-20 मालिका

पहिली टी-20 : ऑकलंड- 24 जानेवारी 2020
दुसरी टी-20 : ऑकलंड- 26 जानेवारी 2020
तिसरी टी-20 : हॅमिल्टन- 29 जानेवारी 2020
चौथी टी-20 : वेलिंग्टन- 31 जानेवारी 2020
पाचवी टी-20 : माऊंट माउंगानुई- 2 फेब्रुवारी 2020

वनडे मालिका

पहिली वनडे : हॅमिल्टन- 5 फेब्रुवारी 2020
दुसरी वनडे : ऑकलंड- 8 फेब्रुवारी 2020
तिसरी वनडे : माऊंट माउंगानुई- 11 फेब्रुवारी 2020

कसोटी मालिका

पहिली कसोटी : वेलिंग्टन- 21 ते 25 फेब्रुवारी 2020
दुसरी कसोटी : ख्राइस्टचर्च- 29 फेब्रुवारी ते 4 मार्च 2020

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: