Ads
मेजवानी

Sankrant Recipes :मकर संक्रांती : भोगीची भाजी

डेस्क desk team

नववर्षात पहिला सण हा मकर संक्रांती असतो. यंदा 2020 या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारीला आहे. तर भोगीचा सण 14 जानेवारीला आहे. याच पार्श्वभूमीवर भोगीची पाककृती जाणून घेऊयात…

 साहित्य :

वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी, हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी, चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा, तीळ – एक टेबल स्पून, ओलं खोबरं – अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे, मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा, तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे, गरम मसाला पावडर – एक चमचा.

कृती :

  • वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा.
  • भांड्यात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या. हिंग, हळद घाला.
  • भाज्या घालून छान परतून घ्या.
  • तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा.
  • गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या.
  • शेवटी कोथिंबीर घाला.भोगीच्या दिवशी ही भाजी करतात.
  • बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: