मुंबई आणि वडापाव हे समीकरणच वेगळं आहे. इथे कितीतरी लोक असे आहेत जे वडापाव खाऊन जगतात. वडापाव हा जिभेला चव देणारा एक वेगळाच पदार्थ जगभरात प्रसिद्ध झालाय. कधीही कोणत्याही वेळी वडापाव खाऊ शकतो. पण हे विशिष्ट आणि अप्रतिम चवीचे वडापाव तुम्हाला मुंबईत काही ठिकाणी जाऊन खायलाच हवेत. ही ठिकाणं तुम्हाला माहीत नसतील तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला देतोय आणि नक्की या ठिकाणांना जाऊन तुम्ही भेट द्या.
- अशोक वडापाव – प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या 35 वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे.
- ग्रॅज्यूएट वडापाव – भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. गेल्या 17 वर्षांपासून लोक इथल्या वडापावचा अस्वाद घेत आहेत.
- बोरकर वडापाव – गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव आहे.
- भाऊ वडापाव – भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर म्हणजे ‘भाऊ वडापाव’. वाल्मिकी नगर या परिसरात हा वडापाव मिळतो.
- लक्ष्मण वडापाव – घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो. लक्ष्मण वडापाव जैन वडापावसाठी देखील प्रसिद्ध आहे.
- शिवाजी वडापाव – मिठीबाई कॉलेज जवळील शिवाजी वडापावदेखील लोकप्रिय आहे.
- सम्राट वडापाव – मिक्स भजींसोबत मिळणारा वडापाव म्हणजे सम्राट वडापाव. हा वडापाव विले पार्ले येथे मिळतो.
- आनंद वडापाव – विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.
- कुंजविहार वडापाव – ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला कुंजविहारचा वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे.
- गजानन वडापाव – चटणीसाठी लोकप्रिय असणारा ठाण्यातील गजानन वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते.