धावपळीच्या आणि कामकाजाच्या जगात प्रत्येक घरात एक तरी वाहन हे असते. वाहन हि अन्न, वस्त्र, निवाऱ्या प्रमाणे एक गरज बनली आहे. बाजारात सध्या दोन प्रकारत गाडी खरेदी करता येते. एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरी डिझेल. बऱ्याच जाणांना पेट्रोल-डिझेल गाड्यांमध्ये नेमका काय फरक असतो हे समजत नाही. त्यामुळे काही वेळा चुकीने पेट्रोलच्या गाडीच डीझेल तर डिझेलच्या गाडीचत पेट्रोल भरले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या गाडीत काय फरक आहे? आणि पेट्रोलच्या गाडीत डिझेल व डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकले तर काय करावे? हे सांगणार आहोत.
पेट्रोल-डिझेलची गाडी कशी ओळखाल?
- पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे इंजिनमध्ये फरक आहे.
- पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात.
- तसेच डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते, तर पेट्रोल डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते.
पेट्रोल ऐवजी डिझेल टाकले तर काय?
- आपल्या दुचाकी वाहनामध्ये तुम्ही जर चुकून पेट्रोल ऐवजी डिझेल भरले, तर त्वरित गाडीच्या इंधनाची टाकी रिकामी करा.
- त्यानंतर इंधनाचा पाईप आणि कार्बोरेटर स्वच्छ करावा.
- जर तुम्ही डिझेलवर दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केलात तर तुमची गाडी चालू होणार नाही आणि चालू झालीच तरी इंजिनवर त्याचा जोर पडून इंजिनातून आवाज येण्यास सुरुवात होईल.
- इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर धूर देखील येणास सुरुवात होईल आणि गाडीचे गॅस्केट जळून जाईल. शेवटी गाडीचे इंजिन निकामी होऊ शकते.
डिझेर ऐवजी पेट्रोल टाकले तर काय?
- सर्वात आधी गाडी बंद करा त्यानंतर मेकॅनिकला बोलवून त्याच्या मदतीने इंधनाची टाकी साफ करून घ्या.
- तसेच इंजिनाच्या ज्या ज्या भागात पेट्रोल गेले असेल त्या सर्व जागा ड्रेन करून घ्याव्यात. अशाने गाडीच्या इंजिनाचे कोणतेही नुकसान होत नाही.