Ads
समीक्षण

Taanaji Movie Review : कसा आहे ‘तान्हाजी’ चित्रपट?

डेस्क desk team

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सहकारी तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.अजय देवगणने प्रमुख भूमिका निभावलेला ‘तान्हाजी’ चित्रपट कसा आहे जाणून घेऊयात.

कथानक काय?

  • या चित्रपटात ‘तान्हाजी’ यांची भूमिका अभिनेता अजय देवगन याने तर किल्लेदार उदयभान राठोडची भूमिका अभिनेता सैफ अली खान याने साकारली आहे.
  • ‘तान्हाजी’ कोंढाणा किल्ल्यावर चढाई करताना किल्लेदार उदयभान राठोडशी कसा सामान करतात, त्यात काय अडचणी येतात व त्यावर कशी मात होते, हा एकंदरीत चित्रपटाच्या कथानकाचा आशय आहे.
  • अर्थात सर्व कथानक पूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे.

● निर्माता : अजय देवगण, भूषण कुमार, क्रिशन कुमार
● दिग्दर्शक : ओम राऊत
● संगीतकार : अजय-अतुल, सचेत–परंपरा, शंकर-एहसान-लॉय, संदीप शिरोधकर
● कलाकार : अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान, काजोल यांसह देवदत्त नागे, शशांक शेंडे व इतर

चित्रपट कसा आहे?

उच्च तांत्रिक मूल्य, पकड घेणारे युद्धाचे दृश्य आणि ऐन युद्धात दिग्दर्शकाने दाखवलेली कल्पकता या सर्व गोष्टी चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. अजय देवगण, सैफ अली खान यांचा अभिनय उत्तम आहे. चित्रपटाचे संगीत आणि कलादिग्दर्शनही उत्कृष्ट असून हा चित्रपट एकदा पाहण्यास हरकत नाही.

 

चित्रपटाला स्टार
3.5

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: