भारतीय संघाने नववर्षातील श्रीलंका विरूद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात विजयी सलामी दिली. शुक्रवारी पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला तब्बल 78 धावांनी पराभव करत विजय मिळवला. पहिला सामना पावसामुळे रद्द झालानंतर भारतीय संघाने दुसरा सामना जिंकला आणि अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाने आणि खेळाडूंनी शानदार खेळी केली. तसेच काही खेळाडू आणि भारतीय संघाने नव्या विक्रमांची नोंद तर काही विक्रमांशी बरोबरी केली आहे. तर टाकूयात एक नजर त्या विक्रमांवर…
>> पुण्यात खेळला गेलेला श्रीलंके विरूद्धचा अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराने लंकेच्या दनुष्का गुणाथिलाकाची विकेट घेतली. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये बुमराने 53 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराह भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ 52 विकेटवर युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर आहेत.
BOOOM 💥💥
Jasprit Bumrah is now the leading wicket-taker in T20Is for #TeamIndia 🎯🎯 pic.twitter.com/7PWeaq2Fyj
— BCCI (@BCCI) January 10, 2020
>> भारतीय संघाने श्रीलंकेवर सलग 12 वेळा विजय मिळवला आहे. तर शुक्रवारी झालेल्या सामना जिंकल्यानंतर 13 वेळा विजय मिळवला आहे. एका संघा विरूद्ध लगातार विजय मिळवण्याच्या पाकिस्तान संघाच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे.
>> भारतीय संघाने आंतराष्ट्रीय सामन्यात 16 व्यांदा 200 च्या पुढे धावा केल्या आहे. या विक्रमाशी कोणत्याही देशाने अद्याप बरोबरी केलेली नाही. यामध्ये दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया संघ आहे. या संघाने 12 वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 11 वेळा केल्या आहेत.
Another clinical display from #TeamIndia to clinch the series 🇮🇳#INDvSL pic.twitter.com/t2sABuvgAB
— BCCI (@BCCI) January 10, 2020
>> भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 हजार धावा पूर्ण केल्या आहे. अशी कामगिरी करणारा तो सहावा खेळाडू आणि दुसरा भारतीय ठरला आहे. या आधी माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने अशी कामगिरी केला आहे.