Ads
समीक्षण

Chhapaak Movie Review : छपाक ने सोडली प्रेक्षकांवर छाप

Chhapaak Movie Review
छपाक चित्रपटाचा रिव्हु
डेस्क desk team

अभिनेत्री दिपिका पादुकोनचा ( Deepika Padukone )  बहुचर्चित आणि तिचा नवीन वर्षातला पहिला बॉलिवुड चित्रपट असलेला छपाक ( Chhapaak ) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. मालती अगरवाल या महिलेवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.राजी सारखा हिट चित्रपट देणाऱ्या मेघना गुलजार यांनी छपाकची सत्य घटना मोठ्या पडद्यावर अतिशय खुबीने मांडली आहे. अ‍ॅसिड हल्ल्यासारखा गंभीर विषय आणि या हल्ल्यानंतर देखील न खचता न्याय मिळवण्यासाठी लढणाऱ्या मालतीचे पात्र अभिनेत्री दिपिका पदुकोनने प्रभावीपणे  साकारले. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर विषयाची छाप सोडण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे.

असे आहे कथानक

मालती ( दिपिका पदुकोन ) सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगी. दिसायला सुंदर आणि सध्या असलेल्या मालतीची सुंदरताच तिच्या विद्रुपतेचे कारण ठरते. एक तर्फी प्रेम आणि वासना यातून बशीर खान उर्फ बब्बु मालतीवर अ‍ॅसिड हल्ला करतो. या हल्ल्यानंतरही खचुन न जाता न्याय मिळवण्यासाठीचा तिचा प्रवास सुरु होतो. तरुण वयात चेहरा विद्रुप झाल्याचे दुख असतेच मात्र त्यावर ती कशा प्रकारे मात करते. अ‍ॅसिड विरोधी मोहीम उभी करते, तिच्या या प्रवासात तिला कोण कोण साथ देते. या सगळ्यात ती प्रेमात पडते आणि तिचा संघर्ष छपाकच्या कथानकातून मांडण्यात आला आहे.

उत्तम दिग्दर्शन, अभिनयाची जोड

अभिनेत्री दिपिका पदुकोनने लक्ष्मी अगरवार ( Laxmi Agarwal )  म्हणजेच मालतीच्या भूमिकेला पुरेपुर न्याय़ दिला आहे. चित्रपटातील तिने साकारलेले अनेक प्रसंग अंगावर शहारे आणतात. तर त्याही प्रसंगात लढण्यासाठी लोकांना प्रेरणा देणारी कणखर लक्ष्मी देखील दिपिकाने उत्तम साकारली आहे. अ‍ॅसिडग्रस्त महिलांना न्याय मिळवुन देण्यासाठी अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारलेले अमोल हे पात्र देखील प्रेक्षकांना चांगलेच लक्षात रहाते. एक गंभीर विषय आणि सत्यकथा, त्याला साजेशी गाणी तसेच अभिनेत्री दिपिका पदुकोनचा अ‍ॅसिड हल्ल्यानंतरचा लुक आणि प्रभावी अभिनय चित्रपटाची जमेची बाजु आहेत. हा संघर्षमय प्रवास पाहण्यासाठी व ती इतक्या यातना सोसूनही कशी आपल्या पायावर उभी राहते हे पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा जरुर पाहावा.

चित्रपटाला स्टार
3.5

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: