मुंबईचा युवा खेळाडू पृथ्वी शॉला काही महिन्यापूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. यामधून सावरत त्यांने चांगलेच पुनरागमन केले होते. मात्र, पुन्हा एकदा कर्नाटक विरूद्धच्या रणजी सामन्यात त्याला खाद्यांला दुखापत झाली आहे. त्यावेळी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारांसाठी पाठविण्यात आले. पण दुखापत पहिल्यानंतर पृथ्वी भारतीय अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याला खेळता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘BCCI’ने या संबंधिची अधिकृत माहिती एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या पत्रकामध्ये पृथ्वीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तत्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्याच्या भारत अ संघात पृथ्वी सहभागी होऊ शकणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पृथ्वी शॉला कर्नाटक विरूद्धच्या रणजी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याच सहकाऱ्याने केलेला ओव्हरथ्रो थांबविण्याच्या नादात दुखापत झाली. त्यामुळे तो पुन्हा एका दुखापतीच्या दृष्टचक्रात अडकला आहे. त्यामुळे आगामी काळात पृथ्वी शॉला भारतीय संघाचे तिकीट कधी मिळणार हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.