महाविकासआघाडीच्या खातेवाटपात दुय्यम स्थान मिळाल्याने कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यातच विजय वडेट्टीवार भाजपात आले तर त्यांचे स्वागत असल्याचे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सध्या इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खर जमीन विकास, भूकंप पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत.मात्र दुय्यम खाती दिल्याने ते नाखुष असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, खातेवाटपानंतर आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला वडेट्टीवार उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वडेट्टीवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.
विजय वडेट्टीवार भाजपात आले तर त्यांचे स्वागत असेल.विदर्भाच्या दृष्टीने वडेट्टीवार यांना देण्यात आलेले खाते दुय्यम असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.