Ads
बातम्या

मध्य रेल्वेवर 25 दिवस ‘या’ पॅसेंजर ट्रेन रद्द!

bhusaval to Nagpur passenger
डेस्क desk team

रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी काहीवेळा एक किंवा दोन दिवसांचा सेवा बंद केली जाते. मात्र, मध्य रेल्वेची भुसावळ ते नागपूर पॅसेंजर येत्या 9 जानेवारी पासून 2 फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच तब्बल 25 दिवस रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, भुसावळ विभागात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या उभारणीसाठी अप 51286 नागपूर-भुसावळ आणि डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर या कालावधित रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

इतर ही रेल्वेंचा खोळंबा

  • या व्यतिरिक्त अप वर्धा-अमरावती पॅसेंजर 11,12,18 ते 20, 25, 26 जानेवारी तर 1 आणि 2 फेब्रुवारीला रद्द करण्यात येणाराय.
  • तेसच डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर 11, 12, 18, 19, 25, 26 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीरोजी रद्द करण्यात येणाराय.
  • तर अप 12290 नागपूर-मुंबई दुरांतो 9 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नागपूर स्थानका ऐवजी अजनी स्थानकावरून  तर डाऊन 12289 मुंबई-नागपूर दुरांतो 9 जानेवारी ते 1 फेब्रुवारपर्यंत अजनी स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलीय.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: