Ads
बातम्या

अभिनेत्री दिपिका पदुकोनचा वाढदिवस; जाणून घ्या अभिनय क्षेत्रातला प्रवास

HappyBirthday Deepika Padukone
डेस्क desk team

अभिनेत्री दिपीका पादुकोनचा 5 जानेवारी म्हणजे आज वाढदिवस असून, ती वयाच्या 34 व्या वर्षात पदार्पण करत आहे. बॉलिवुड मधील आघाडीच्या, यशस्वी तसेच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादित दिपिकाचे नाव घेतले जाते. यंदाचा वाढदिवस दिपिकासाठी खास यासाठी आहे, कारण याच महिन्यानत तिचा अॅसिड हल्ल्यावर आधारित बहुचर्चित सत्यघटनेवर आधारीत छपाक चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिपिका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, यंदा ती लखनऊ मधील एका कॅफेत अॅसिड पिडीतांसोबत वाढदिवस साजरा करणार आहे. दरम्यान, बॉलिवुडच्या या यशस्वी अभिनेत्रीला वाढदिवसा निमत्त बातमीदारच्या हार्दिक शुभेच्छा.

बॉलिवुड प्रवास

डेनमार्कच्या कोपनहेगन मध्ये 5 जानेवारिला जन्मलेल्या अभिनेत्री दिपिका पदुकोनने आपल्या उंची मुळे मॉडलिंग मधुन करियरला सुरवात केली. अनेक मोठ- मोठ्या ब्रेंड अंबासिडर आणि अॅड मध्ये काम करत तिने करियरला सुरवात केली. यानंतर हिमेश रेशमियाच्या नाम हे तेरा अल्बम मधुन दिपिकाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. यानंतर 2006 साली कन्नड चित्रपट ऐश्वर्या मधुन तिने अभिनेत्री म्हणून काम केले. तर शाहरुख खान सोबतच्या 2007 साली आलेल्या ओम शांती ओम या चित्रपटाने दिपिकाला खरी ओळख दिली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची दखल घेत तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री नविन पदार्पण फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

हिट चित्रपट

दरम्यान, पदार्पणातच हिट चित्रपट देणाऱ्या दिपिकाने ये जवानी हे दिवानी, चांदणी चौक टु चायना, चेन्नई एक्स्प्रेस, रामलीला, कॉकटेल, रेस-२, पदमावती, बाजीराव मस्तानी यासह अनेक हिट चित्रपट दिले. तर 2017 मध्ये दिपिकाने xxx return of xander cage चित्रपटातून ह़ॉलिवुड मध्ये इंट्री केली. लवकरच तिचा छपाक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर एप्रिल महिन्यात दिपिकाचा 83 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छपाक दिपिकाचा लग्ना नंतरचा पहिला चित्रपट आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये ती रणवीर सिंग सोबत लग्न बंधनात अडकली.

अभिनेत्री दिपिका पदुकोन चे कुंटुंब बॅंग्लोरमध्ये असून, प्रसिद्ध बॅडमिंटन पट्टु प्रकाश पदुकोन तिचे वडिल आहेत. दिपिका अभिनया सोबतच लिव्ह लव्ह लाईफ नावाची स्वयंसेवी संस्था देखील चालवते. दिपिकाला एक लहान बहिण असून ती दिपिका पेक्षा 5 वर्षे लहान आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: