केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि व्यावसायीकांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा निश्चित वेतन मिळावे यासाठी अटल पेन्शन योजना राबवली जाते. पण आता याच पेन्शन योजनेत सुधारणा करण्यासाठी या निवृत्तीवेतन निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या पीएफआरडीएने केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे.या प्रस्तावात मासिक पेन्शनची रक्कम 5000 रूपयांवरून 10,000 रूपये करावी. तर त्यासोबतच या योजनेत सहभाग घेण्याच्या वयोमर्यादा 40 वरून 60 वर्षांपर्यंत वाढविण्याची शिफारसही केली आहे.
विद्यमान योजनेच्या नियमानुसार वयाच्या 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना या योजनेत निवृत्तीनंतर 5 हजार रूपये मिळतात. म्हणजेच दरमहा 210 रूपये जमा करावे लागतात. तर दरमहा 10 हजार रूपये पेन्शन धारकांना 420 रूपये भरावे लागणार. तर वर्षभरात 1 लाख 20 हजारांची एकरकमी पेन्शन मिळेल. तर पती-पत्नी दोघे ही योजनेत सहभागी झाले तर त्यांना महिन्याला 20 हजार मिळतील व त्यांना दरमहिन्याला 1154 रूपये भरावे लागती.
तर जाणून घेऊयात या योजनेचे फायदे
- या योजनेत 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी बँक खाते आवश्यक आहे.
- सभासद जितके जास्त पैसे भरेल तितके त्याला अधिक पेन्शन मिळते. पेन्शनधारक मासिक, तिमाही आणि सहामाही पद्धतीने पेन्शन खात्यात गुंतवणूक करू शकतो.
- या योजनेत सध्याच्या नियमानुसार निवृत्तीनंतर त्याला वर्षाला 60 हजार किंवा महिना 5 हजार इतकी पेन्शन मर्यादा आहे.
- अटल पेन्शन योजनेत सभासदाला 60 वर्षानंतर दर महिन्याला 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि 5000 रुपये असे निश्चित पेन्शन मिळते.
- या योजनेत गुंतवणूक केल्यास ‘आयकर कलम 80 सीसीडी’ नुसार कर वजावट मिळते.
- या योजनेतील सुरुवातीचे पाच वर्षे सरकारकडून देखील योगदान दिले जाते.