आजकालच जिवन हे धावपळीच जीवन आहे. व्यस्त रुटीन, बदलते हवामान आणि खाण्या पिण्याच्या बदलत्या वेळा यामुळे स्वस्थ बिघडत असते. मात्र या सगळ्या सोबतच आपल्याला असलेल्या काही वाईट सवई आणि चुकीच्या माहिती मुळे देखील आरोग्यावर परिणाम होत असतो. मात्र या व्यस्त रुटीनमध्ये सुद्धा तुम्ही जर या टिप्स वापरल्या आणि काही सवई बदलल्या तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल.
जेवणा नंतर लगेचच झोपणे
जेवणा नंतर लगेचच झोपणे म्हणजे लठ्ठ पणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. जेवणा नंतर अनेकांना खुप आळस येतो आणि ते हात धुतल्या धुतल्या अंथरुणावर पडतात, मात्र या मुळे पचनासंबंधी देखील आजार होण्याची शक्यता आहे.
जेवल्यानंतर लगेच फळ खाणे
आपल्या रोजच्या आहारत फळे खाणे चांगले असल्याचे बोलले जाते. दररोज एक तरी फळ खावे हा सल्ला चांगला असला तरी जेवल्या वर लगेचच फळ खाणे आयोग्य. कारण यामुळे पोटाच्या तक्रारींचा सामना करावा लागतो.
जेवणा नंतर आंघोळ
दरम्यान, अनेकांना बाहेरु आल्यावर आंघोळ करण्याची सवय असते. शरीर स्वच्छतेच्या दृष्टीने ही सवय नक्कीच चांगली आहे. मात्र आंघोळ जेवणा आधी करावी मात्र जेवना नंतर करु नये. कारण अंघोळ केल्यानंतर शरीराचा रक्त प्रवाह वाढलेला असतो. अशा वेळी जेवना नंतर अंघोळ केल्यास पचन क्रियेचा वेग मंदावतो.
जेवल्या नंतर लगेच चालणे
जेवल्यानंतर अन्न चांगले पचन व्हावे यासाठी शतपावली म्हणजे चालणे चांगेल असते. मात्र जेवल्या नंतर लगेचच चालण्यास सुरवात करुनये. असे केल्याने पोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो. तेंव्हा जेवणाच्या काही वेळा नंतर चालावे.
जेवनानंतर चहा
अनेकांना दिवसात खुप वेळा चहा पिण्याची सवय असत, त्यात जेवल्यावर किंवा झोपण्यापुर्वी चहा पिण्याची सवय असणारे देखील अनेक असतात. मात्र जेवल्या नंतर चहा पिणे टाळावे. कारण जेवणा नंतर चहा पिल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो. साधारण सवय नसलेले देखील अनेक लोक बाहेर फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये जेवना नंतर चहा पितात. मात्र पुधील प्रवासाच्या दृष्टीने ते चांगेल ठरत नाही.
धुम्रपान
धुम्रपान करणे आरोग्याला घातक असते. त्यातही जेवल्या नंतर सिग्रेट पिण्याची अनेकांना सवय असते, मात्र तुमच्या सिग्रट ओढण्याचा तुमच्या बरोबर तुमच्या अजुबाजुच्या लोकांना देखील त्रास होऊ शकतो.