Ads
मेजवानी

झटपट बनणारा रवा डोसा

डेस्क desk team

घरच्या घरी झटपट बनवता येणाऱ्या रव्याच्या डोश्याची पाककृती जाणून घेऊयात..

साहित्य : बारीक रवा, जाड पोहे, डाळीचे पीठ, मीठ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, सोडा

 कृती :

  • बारीक रवा 1 वाटी, अर्धी वाटी डाळीचे पीठ, डोश्याचे बटर जसे असते एवढे पातळ भिजवून घ्या.
  • जाड पोहे भिजवून घ्या आणि मिक्सर मधून काढून घ्या . हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्या .
  • या मिश्रणात मीठ, चिमूटभर खायचा सोडा घालून मिश्रण 10 मिनिटे भिजत ठेवा.
  • तवा चांगला गरम झाल्यावर तव्याला तेल न लावता लहान आकाराचे डोसे घालायला सुरुवात करा.
  • डाळीच्या पीठामुळे डोसा लालसर भाजल्यावर आतल्या बाजूनेच गरम मसाला भुरभुरून टाका.
  • त्यावर कांदा , टोमॅटो मध्यभागी उभी लाईन मध्ये सजवा. आणि डोसा रोल करून तव्यावरून काढून घ्या …

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: