नववर्षाच्या सुरूवातीलाच भारत विरूद्ध श्रीलंका या दोन संघात टी-20 सामना रंगणार आहे. या संघात 3 सामने खेळले जाणार असून यातील पहिला सामना 5 जानेवारीला आसामच्या बारपासरा क्रिकेट स्टेडीयममध्ये खेळवला जाणार आहे.
आसाममध्ये गेल्या काही दिवस ‘CAB’ च्या मुद्दयावरून अनेक आंदोलन, जाळपोळ करण्यात आली. या सर्व प्रकरणाची झळ क्रिकेट सामन्याना लागू नये आणि अनपेक्षित प्रकार घडू नये यासाठी सामन्यात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. क्रिकेट चाहत्यांना आता स्टेडीयममध्ये चौकार-षटकारचे फलक, मार्कर पेन नेण्यास मनाई करण्यात आली आहे. ही माहिती आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजीत सायका यांनी दिली.
दरम्यान, श्रीलंके विरूद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारताने तगड्या खेळाडूंची निवड केली आहे. पाहुयात तर कोणत्या खेळाडूंची या मालिकेसाठी वर्णी लागली आहे.
पाहा संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन