बहुचर्चीत आणि चाहत्यांच्या टीकेला सामोरा गेलेला ‘धुरळा’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘टाईम प्लीज’, ‘मला काही प्रॉब्लेम नाही’, ‘आनंदी गोपाळ’, ‘वायझेड’, ‘डबल सीट’ अशा वेगळ्या धाटणीच्या आणि प्रेक्षकांना आपलेसा केलेल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी ‘धुरळा’ ची धुरा हाती घेतली होती व ती यशस्वी पणे पूर्णत्वास आणण्यास दिग्दर्शकाला यश आल्याचे दिसते.
कलाकारांची मांदीयाळी
चित्रपटात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, प्रसाद ओक, अलका कुबल-आठल्ये हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. अशी जबदरदस्त स्टारकास्ट ‘धुरळा’ चित्रपटाला लाभली आहे. राजकीय कथानक आणि लोकप्रिय कलाकार हे समीकरण दिग्दर्शक समीर आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांनी मनोरंजक पद्धतीने रूपेरी पडद्यापर उभा केले आहे.
चित्रपटाची कथा
‘धुरळा’ चित्रपटाचे कथानक गावातील सरपंचपदाची निवडणुक आणि खुर्ची संघर्षा भोवती फिरणारी आहे. निवृत्ती उभे हे गेली अनेक वर्ष गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळत आहेत. वृद्धापकाळाने त्यांचे निधन होते आणि सरपंचाची खुर्ची रिकामी होते. या खुर्चीवर बसण्यासाठी विरोधी उमेदवार हरीशभाऊ गाढवे (प्रसाद ओक) यांची प्रचंड आस आहे. आता खुर्ची रिकामी असल्यामुळे ती मिळवण्यासाठी गावातील राजकारणात हरीशभाऊ वेग घेतो. तर दुसरीकडे घरातील कर्ता व्यक्ती निधन पावल्याने संपूर्ण घरावर दु:खाचे डोंगर कोसळते. आतापर्यंत घरात एकमेकाना सांभाळणारे सदस्य सतेच्या हव्यासाने राजकारणार उडी मारतात. मुलगा नवनाथ उभे (अंकुश चौधरी) आणि पत्नी ज्योती उभे (अलका कुबल) यांच्यात सरपंचपदाच्या खुर्चीसाठी सत्तासंघर्ष चालू होतो. राजकारणा पासून दूर राहाणाऱ्या ज्योती उभे आमदारांच्या (उदय सबनीस) आग्रहाखातर आणि सुनैनाताई (सुलेखा तळवलकर) यांच्या साहाय्याने निवडणूक लढवण्यास सज्ज होतात. निवृत्ती यांची पत्नी ज्योती ही नवनाथ याची सावत्र आई असते. त्यामुळे सावत्र मुलगा आणि आई यांच्यात खर्चीसाठीचा संघर्ष सुरू होतो. तर तिसरीकडे कुटुंबातील मधला मुलगा हणमंत (सिद्धार्थ जाधव) आणि त्याची पत्नी मोनिका (सोनाली कुलकर्णी) देखील राजकारणाच्या रिंगणात उद्या मारताता. त्यामुळे आता नेमक कोण सत्ता स्थापनेचा धुरळा उडवितो? तिहेरी लढत कशी होते? त्यासोबतच कुटुंबातील धाकटा मुलगा निलेश (अमेय वाघ) या सर्व प्रकारात काय भुमिका घेतो? तर कथेला कसे रंजक वळण येते हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
चित्रपटाचे यश
दरम्यान, चित्रपटात प्रत्येक कलाकारांनी आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळे हा सत्तेचा धुरळा रुपेरी पडद्यावर उडविण्यात दिग्दर्शक, लेखक यांना यश आलेले दिसते. तसेच गावातील वातावरण हुबेहूब उतरविण्यास यश आले आहे. त्याचसोबत नाही सुटला जन्माचा धुरळा या गाण्याने ही चित्रपटास एकरूप झाल्याचे दिसते.