Ads
बातम्या

Mumbai Mega Block : मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक; ‘परे’ला दिलासा

megablock
डेस्क desk team

रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी लोकल, लेन किंवा इतर तांत्रिक गोष्टींच्या दुरूस्तीसाठी ब्लॉक घेतला जातो. तर दरवेळी प्रमाणे उद्या, 5 जानेवारीला ही मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर विक्रोळी स्थानकातील पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी विशेष मध्यरात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक आज रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत असणार आहे. उद्या घेण्यात येणारा पश्चिम रेल्वेवरिल ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. कारण, सोमवार-मंगळवारी वांद्रे यार्ड टर्मिनसच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पण यामुळे लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानका दरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणाम

  • ब्लॉक काळात अप जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
  • यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, उर्वरित लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे या स्थानका दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत अप-डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे.

परिणाम

  • ब्लॉक काळातील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहतील.
  • पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची मुभा.

विशेष मध्यरात्रकालीन ब्लॉक

विक्रोळी येथील पूलाच्या गर्डर टाकण्याचे कामासाठी विद्याविहार ते कुर्ला स्थानका दरम्यान आज, शनिवार रात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत अप-जलद आणि डाऊन-धीम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.

परिणाम

  • सीएसएमटी येथून शनिवारी रात्री 11.10 नंतर सुटणाऱ्या सर्व जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून धावतील.
  • ठाणे स्थानकातून शनिवारी रात्री 11.25 नंतर सीएसएमटीसाठी रवाना होणाऱ्या जलद लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येईल.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: