Ads
मनोरंजन

प्रेक्षकांसाठी यावर्षी ‘या’ चित्रपटांची मादियाळी!

2020 Bollywood movie
डेस्क desk team

मागील 2019 हे वर्ष राजकारण, क्रिडा, समाजकारण, मनोरंजन अशा अनेक गोष्टींसाठी गाजले. तर आता त्यातील काही गोष्टी सोबत घेऊन आणि उर्वरित गोष्टी मागे सारून 2020 या नव्या वर्षाची सुरूवात झाली आहे. मागील वर्षाप्रमाणे हे वर्षही बॉलिवूड साठी खास ठरणार आहे. कारण या वर्षी ही दमदार बायोपिक, विनोदी, मनोरंजनात्मक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे यात अनेक दिग्गज कलाकार आमने सामने असणार आहे. त्यामुळे या वर्षात कोणता चित्रपट बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. तर पाहुयात या वर्षात कोण- कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

तान्हाजी- द अनसंग वॉरियर, छपाक

येत्या 10 जानेवारीला अभिनेता अजय देवगन आणि काजोल याची जोडी ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून अनेक वर्षांनी चाहत्यांना पाहायला मिळाणार आहे. या चित्रपटात अजय देवगनने तान्हाजी मालुसरे यांची तर काजोलने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. यासोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोनचा ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपीका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे आता कोणता चित्रपट वर्षाच्या सुरूवातीलाच बॉक्स ऑफिसवर कमाई करतो हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्ट्रीट डान्सर 3 डी, पंगा

जानेवारी महिन्याच्या 24 तारखेला रेमो डीसूजा दिग्दर्शित आणि वरूण धवन, श्रद्धा कपूर, नोराह फतेही अशी जबरदस्त स्टारकास्ट लाभलेला ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच यासोबत कंगणा राणौतचा ‘पंगा’ हा चित्रपट ही प्रदर्शित होणार आहे.

लव आज कल 2, शुभ मंगल ज्यादा सावधान

अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन या दोघांमधील केमिस्ट्रीची चर्चा सर्वत्र चालू असतानाच. आता येत्या 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी या जोडीचा ‘लव आज कल’ या चित्रपटाचा सीक्वल ‘लव आज कल 2’ प्रदर्शित होणार आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यातच राजकुमार राव यांचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

सूर्यवंशी

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा बहुप्रदर्शित असा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात सर्वत्र चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे.

83

रणवीर सिंग आणि दीपीका पादुकोन ही लोकप्रिय जोडी एकत्र ’83’ या चित्रपटातून चाहत्यांना यावर्षी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट टीमने पहिल्यांदा जिंकलेल्या वर्ल्ड कप वर आधारित आहे. यात रणवीरने कपिल देव यांची तर दीपीकाने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

गुलाबो सिताबो, रूह अफ्जा 

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांची प्रमुख भुमिका असणारा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर  याच दिवशी जान्हवी कपूर, राजकुमार राव यांचा ‘रूह अफ्जा’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कुली नंबर 1

या वर्षी मे महिन्यात अभिनेता गोविदा याचा ‘कुली नंबर 1’ या चित्रपटाचा रिमेक प्रदर्शित होणार आहे. या रिमेकमध्ये अभिनेता वरूण धवन अभिनेत्री सारा अली खान या दोघांना प्रमुख भुमिकेत पाहायला मिळणार आहे.

सडक 2

आलिया भट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त. पूजा भट्ट या स्टार कास्टचा ‘सडक 2’ हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आलिया भट आपले वडीलांसोबत काम करताना दिसणार आहे.

भूज द प्राइड ऑफ इंडिया

अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिकेत असणारा ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपट 14 ऑगस्ट 2020 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये 1971 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.

लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज

यंदा अक्षय कुमारचे ‘सूर्यवंशी’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात अक्षय तृतीयपंथीयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त अक्षय कुमार आणखी एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ असे असून हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणारआ हे.

लाल सिंग चड्ढा

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुख्य भूमिका असणारा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट डिसेंबर महिन्यात नाताळमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूर मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: