लोकप्रिय चीनी स्मार्टफोन कंपनी ‘Realme’ने नववर्षाच्या सुरूवातीलाच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ‘Realme 2020’ या खास सेलची घोषणा केली आहे. हा सेल आजपासून चालू होत असून 5 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर भारी डिस्काउंट दिला जाणार आहे.
या स्मार्टफोनवर डिस्काउंट
>>‘Realme 3 Pro’ या स्मार्टफोनवर कंपनी 3 हजार रुपयांचा डिस्काउंट देत मिळणार असून 4 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन ग्राहकांना 9,999 रुपयांत तर 6 जीबीचा 11,999 रुपयांत आणि 128 जीबी स्टोरेजचा फोन 12,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.
>>‘Realme X’ या स्मार्टफोनवर सेलमध्ये 2 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 4 जीबी रॅमचा स्मार्टफोन 14,999 रुपयांत तर 8 जीबी रॅमचा स्मार्टफोन 17,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
>>‘Realme 3 I’ या फोनवर 2 हजारांचा डिस्काउंट दिला जात असून सेलमध्ये हा स्मार्टफोन 6,99 रुपयांत तर तर 4 जीबी रॅमचा स्मार्टफोन 7,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.
>>‘Realme 5 Pro’ या स्मार्टफोनच्या तिन्ही व्हेरिएंटला 1 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हे स्मार्टफोन 12,999 रुपये, 13,999 रुपये आणि 15,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
>>‘Realme C 2’ या स्मार्टफोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्टफोन 5,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर 3 जीबी रॅमचा स्मार्टफोन 6,999 रुपयांत खरेदी करण्याची ग्राहकांना संधी मिळणार आहे.