राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या वेळी राजपथावर पार पडणाऱ्या संचालनावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसून येणार नाही आहे. कारण याच्या प्रस्तावाला नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजपथावर पार पडणाऱ्या या सोहळ्यात काही राज्यांना संधी दिली जाते. 2016 मध्ये ही राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसून आला नव्हता. तसेच यंदा ही तो दिसणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण राजपथावर यंदा 16 राज्य आणि 6 केंद्रीय मंत्रालय यांची एकूण 22 चित्ररथाचा समावेश असणार आहे. यंदाच्या वेळी महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या 175 व्या वर्षाच्या आधारित चित्ररथाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र या चित्ररथाला नाकारण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथासोबत पश्चिम बंगालच्या चित्ररथालासुद्धा नाकारण्यात आला आहे. यावरुन आता वाद सुरु झाला असून केंद्र सरकारने मुद्दामुन चित्ररथ नाकारला असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममती बॅनर्जी यांनी सुरु केलेल्या कन्या योजनेच्या आधारावर चित्ररथ तयार करण्यात येणार होता. मात्र तो सांस्कृतिक मंत्रालयाकडून नाकारण्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केल्याने चित्ररथ नाकारला असल्याचे तृणमुल पक्षाचे खासदार सौरग रॉय यांनी म्हटले आहे.
Tweet:
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली.हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020
Centre's rejection of Bengal's tableau proposal for #RepublicDay parade an insult to people of the state, result of protests against amended citizenship law: TMC
— Press Trust of India (@PTI_News) January 2, 2020
येत्या काही दिवसात पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. तर ममता बॅनर्जी यांची सत्ता पाडून भाजपची सत्ता कशी प्रस्थापित केली जाईल याचा प्रयत्न नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्याकडून केला जाऊ शकतो.