दक्षिण आफ्रिकेच्या ओआर टांबो विमानतळावर आपल्या कुटुंबाबरोबर जात असलेल्या 10 वर्षीय मुलाला टी-शर्ट बदलण्यास सांगितले.याचे कारण त्या मुलाच्या टी-शर्टवर सापाचे चित्र होते. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्याबद्दल सांगितले की, सापाचे चित्रामुळे विमानातील प्रवाशी व क्रू मेबर्सला अस्वस्थ वाटू शकते.
10 वर्षीय लुकसची आई मार्गा व वडील स्टिव्ह यांनी सांगितले ते 17 डिसेंबरला प्रवासाला निघाले होते. दरम्यान लुकसने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता व त्यावर हिरव्या रंगाचा साप होता. हे टी-शर्ट पाहिल्यावर विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून टी-शर्ट काढण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, ते हवे तर टी-शर्टवरती काहीही घालू शकतात.
A Boy, 10, is forced to take his shirt off before boarding a flight from #NewZealand to #SouthAfrica because it had a picture of a reptile on it ✈️😬 pic.twitter.com/T0O6DqfBDo
— aviation-fails (@aviation07fails) December 26, 2019
लुकसची आई म्हणाली : आम्हाला कोणताही वाद नको होता. त्यामुळे आम्ही लुकसला शर्ट उलटे करून घालण्यास सांगितले.
विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले : सुरक्षा अधिकाऱ्यांना अधिकार आहे की कोणत्याही अस्वस्थ स्थिती निर्माण करणाऱ्या गोष्टींना विमानतळ व विमानात जाण्यापासून रोखू शकतात.